Monday, September 24, 2012

आपल जगण.. !!

ट्रेनच तिकीट काढताना लक्षात आलं, बाजूच्या खिशात ठेवलेली १०० रुपयाची नोट रुमाल काढताना पडली कुठेतरी. असे पैसे गेले कि दरिद्री, संपल्याची भावना येते न ती खूप वाईट असते हो..!!! सामान्य माणूस हो आपण, सकाळी प्रवास करता करताच संध्याकाळी मुलांना काय खायला घेऊन जायचं याचा विचार करून ५० रुपये बाजूला काढणारे आपण. मग असे आपल्या भाषेत काही खाता न पिता पैसे गेले कि हळहळण खूपच जीवाला लागत हो..!!

तसाच उभा राहिलो प्ल्यटफोर्मवर ... रोज उशीर होतो म्हणून आज घरातून लवकरच निघालो होतो , पण घाईघाईत १०० रुपये पाडून बसलो कुठेतरी, आज दिवस भर चलबिचल होत राहणार मनात....!!!

कसना आपल सामान्य माणसाच आयुष्य, किती काळजीने अक्षरशा पोखरलेल असत...!! अस पैसे पडणं किंवा असे इतर प्रसंग घडण आणि हळहळण सामान्य माणसाठी खूपच असामान्य गोष्ट आहे. कुठे लक्ष असत आजकाल माझ तेच कळत नाही, सकाळी पेपर वाचतानाच जो मूड खराब होतो तो दुपारी डब्बा उघडल्यावर  एकतर त्याहून खराब होतो किवा थोड फार हसू येत चेहर्यावर....चिडचिड वाढलीये आजकाल खूप...पण मला आज मनातल बोलावस वाटतंय .... प्रेमाने काकुळतीला येऊन चीड मांडावीशी वाटतीये..!!

जरा समजून घ्या जमल तर......!!

वर्तमानपत्रातले ते पहिले दुसरे आणि तिसरे पान
घोटाळा, भ्रष्टाचार, बलात्कार यांनाच मान
माझा ८००० चा पगार हि पुरतो हो आम्हाला
साहेब तुम्ही ८०००० कोटी कसे खर्च करता हे तरी कळू द्या राव आम्हाला

राग न वाटता , अभिमानच वाटतो तुमचा
कस बर जमत, सांगा कधी गरिबांना
१०-१२ तास काम, प्रवास करून थकत हो मन
तरी महिन्याच्या शेवटच्या तारखेकडे लक्ष ठेवून स्वतःच उल्हसित होत हो मन...!!

साहेब घोटाळ्यातल्या पैशात माझ्या घामाचाही पैसा आहे म्हणतात
मला नाही कळत हो साहेब..... लोकच म्हणतात
मुलगा सायकल मागतोय, पण या महिन्यात बायकोच आजारी पडली हो
सायकल राहिली, होत्या त्या पैशातून औषधही पूर्ण आली नाहीत हो
चाक माझ्या डोक्यात मात्र फिरत राहिली ... महिन्याचे उरलेले दिवस पाहून हो...!!

रोजचे कित्ती प्रश्न मांडलेले..
वाढलेल्या बस प्रवासापासून, सगळेच भाव वाढलेले
१०-१० रुपये खर्च होताना, महिन्याचे उरलेले दिवस आठवतात हो साहेब..
साहेब सांगा ना.. तुम्ही भ्रष्टाचार केले नसता तर थोड तरी स्वस्त जगता आल असत का हो साहेब...!!

५ वर्षातला १ दिवस मी राजा असतो
साहेब हात जोडून विनवणी करतात हो... भावूक मन होऊन मीही दुसर्या दिवशी मतदान करतो हो...

पण...

हात जोडणारे साहेब मोठे झालेत आता...
आज मी हात जोडून पाया पडल्या तरी साहेब ओळखताच नाहीत हो मला...
दुचाकी निशाणी असलेले साहेब, चार चाकातून थंड फिरतात हो आता...
साहेबांनी कुणाच्या प्रगतीसाठी हात जोडले तेच कळत नाही हो आता..
नगरसेवक / आमदार / खासदार साहेब सांगा ना ... मला ही थोडा पगार वाढवून हवाय हो, मुलाची सायकल राहिलीये अजून.. हात जाऊ दे, कुणाच्या पाया पडू, ते तरी सांगा हो साहेब आता...!!

नाक्यानाक्यावर पैसे खाल्याचा चर्चा होतात हो आता ...
साहेब....एवढ सगळ मोकळ मोकळ झालाय का हो आता..??
मी आपला परवा बसमध्ये २ रुपयाच कुणाचतरी पडलेलं नाण उचललच नाही हो ...!!
अब्रू कुणाची महाग, स्वस्त विचार करायला हवा हो आता..!!

साहेब १२ महिन्याचे आहात का हो तुम्ही..??
वाढदिवसाचे कित्ती कित्ती पोस्टर्स तुमचे??
काल बायकोचा वाढदिवस  विसरलो
साहेब...धन्यवाद तुमचे, निदान तुमच्या पोस्टर्सने आजतरी लक्षात आणले माझ्या

सामान्य माणसाचे दिवस कसे जाणार हो ..??
दडपण, भीती वाटते खूप
खूप जगावस वाटत पण
जीवघेणा प्रवास... जीव घेण्यासाठीच आसुसलाय
छातीवर ओझ जाणवत खूप
दडपते काळजीने छाती

हरवून जावस वाटत कधीतरी ....
सगळ सोडून स्वतासाठी डोळे बंद करून श्वास घ्यावासा वाटतो कधीतरी ...
सगळ नीट सुंदर होईल अस वाटत कधीतरी...!!

झाडाच पान व्हावस वाटत मला
सुंदर हिरवं गार
पाऊस झेलत ... कोवळी उन्ह घेत स्वछंद फडफडवास वाटत मला
चालेल छोट आयुष्य पण मोकळा श्वास घ्यावास वाटतंय मला ...!!

---------------------------------------------------------------------------
धक्का कोणी मारला???
ट्रेन आली वाटत ....पाठीच राहिलो आजही सर्वांच्या
आजही उभ्यानेच जाव लागणार वाटत मला....!!

----- सागर

Tuesday, July 24, 2012

मृत्यू ....एका आजोबांचा





८२ वर्षीय आजोबांचा मृत्यू .... रोजची तशी नेहमीचीच, दुर्लक्षीलेलीच एक सर्वसामान्य बातमी. घरातल्यांसाठी थोडी दु:खाची, इतरांसाठी थोड दु:ख आणि उपस्थित राहाण्याच निव्वळ कर्तव्य.....

पण या सर्वात काही व्यक्ती थोड्या जास्तच खिन्न असतात, सगळे गेलेल्या आजोबांच्याच वयाचे. खिन्न अगदी पापणी न मिटता शून्यात लावलेली नजर. वाटल, कि मित्र गेला असेल, आठवणीत गढले असतील, म्हणून जास्त लक्ष दिल नाही.

पण का कोण जाणे गेलेल्या आजोबांपेक्षा कदाचित शून्यात गेलेले आजोबाच जास्त डोळ्यासमोर येत होते. काय एवढा विचार करत असतील?

काय अंतर असेल एका मेलेल्या वृद्ध माणसात आणी भान हरपलेल्या अजूनही जिवंत धडधडणाऱ्या हृदयात?? तसे मृत्यू कुठल्याही वयात होतात, पण वृद्धाने वृद्धाचा मृत्यू पाहिल्यावर काय विचारतरंग उठत असतील, या गोष्टींचा नक्कीच विचार करावासा वाटतो ...

कदाचित थोड फार असाच वाटत असेल त्या .... आणि तश्याच इतर आजोबानाही!!


समोरचा तो निष्प्राण देह
ना हालचाल , ना गंध
थंड गार, न उष्मा श्वासाचा
मन शांत....कोमेजलेल
गेला तो ........

मी पण असाच जाणार??
कुठे गेला जीव माझा?
जीर्ण म्हातारा जख्खड होतो मी
तरी सगळे म्हणतात
वृद्धापकाळ म्हणजे दुसर बालपण

पण जगताच नाही आल मला
अंतरा अंतराने एक एक म्हातार बाळ जात राहील
ना रडल, ना हसलं
डोळे मिटले, ना पापण्या ओल्या
प्राण गेला, श्वास हि सोडला
सगळ पाहायचच राहून गेल
साल ..... पुन्हा जगायचंच राहून गेल

थकलो रे मी .... धावायचं होत मला
नाही नीट चालू शकलो....... लपायचं होत मला
असह्य वेदना आजाराच्या..... सर्व विसरून हसायचं होत मला
खुपश्या आठवणी...... मन मोकळ बोलायचं होत मला
पण एकटाच मी..... माझ मलाच होता नाही आल रे मला


माझाही श्वास असाच जाईल?
शांत निष्प्राण मेलेला मी .....मला अनुभवता येईल काही?
कस असेल ते सर्व?
कधी असेल ते सर्व?
मला जगायचं ..... अजून जगायचं!!
पोखरतय मला आतून
खूप धडधड वाढलीये
नका जाळू मला
माझा अस्तित्वच नष्ट करू नका
आज आहे... आणि उद्या राख????
तीही नाहीशी होईल... एका वाऱ्याबरोबर

उरेल फक्त .......माझा...............एक फोटो!!!


-------------------------------------------------------------------------------


---- सागर







Tuesday, July 3, 2012

मन अपेक्षांचे ओझे

(एक सुशिक्षित, सुसंस्कृत पण बेकार तरुण, आई वडिलांवर प्रेम करणारा, पावसावर प्रचंड प्रेम करणारा, नवा पाऊस, नव्या संधी घेऊन येईल अशी आशा करणाऱ्या तरुणाचे शब्द)


मन कोंदट भीतीचे
मन अपेक्षांचे ओझे
सुख आई-वडील
दु:ख अपेक्षांचे ओझे

आत उद्विग्न चळवळ
भूलथापा रोजरोज
डोळे पावसाकडे नंतर
आधी अपेक्षांचे ओझे

मन झुंजूमुंजू पाऊस
धुंवाधार बरसात
ओल्या पालवी संगे
रडू नाचत गातात

किती हसू, किती रडू
फक्त हाल, नाही बळ
अश्रू ओघळे गालावर
पाऊसही क्षणोक्षण

जड झाले मन माझे
सुख दु:ख बरसात
अश्रू ओघळे न थांबे
मन फक्त अपेक्षांचे ओझे


-- सागर

Thursday, April 30, 2009

मरण आणि आपण..!!!














(२६/११ च्या हल्या नंतर अगतिक होऊन लिहिले शब्द)

सामान्यांचा जीव अजुनही घुसमटतोय
उच्च्भ्रुंच्या फ़क्त मेणबत्या जलतायत
सामान्यांचे जीव ट्रेन आणि रस्त्यात जाणारे
महागडे जीव फ़क्त ताजवाल्यांचे .....!!

महागड्या चाकातुन ........उतरनारे सेलेब्रिटी
तिथून चालत ......मेनबत्या जाळन्यासाठी
उद्वेग कशाचा .....???
माणस मेल्याचा ...???....की ताज जळल्याचा .......???
की आता वर्षभर पार्ट्या होणार नाहीत याचा....???
आपणही असतो यांच्या बरोबर ....... N Series घेउन फोटो काढत॥!!

१० आले २०० मेले...
१०० राजकारणी आले,फक्त बोलून मारून गेले...
आता तर भाषणही संपली॥
लोकांचा प्रक्षोभ तर कधीचाच गाडला गेलाय
प्रत्यक्ष कृती ऐवजी नव्या शपथविध्या होतील॥
नव्या तिजोरया भरतील...... नव्या मंत्र्यांच्या ......!!!

भ्याड आहोत आपण...
लाचाऱ्यागत मदतीची भिक घेणारे....!!
स्वताचाच आक्रोश ऐकून कानावर हात ठेवणारे...!!

जगण्यापेक्षा मरनाच सोप्प जालय म्हननारे आपण
मुंबई स्पिरिटच्या नावाखाली घरून निघताना मुलांच्या तोंडाकड़े शेवटच पाहतोय अस पाहणारे आपण
धन्यवाद सहाव्या मजल्यावर बसलेल्या त्या मंत्र्यांचे
बाकि काही नाही निदान मरण तरी स्वस्त करणारे.....!!

शेवटी पुन्हा असेच जीव जाणार
पुन्हा अश्याच मेन्बत्या जळणार
सोन्याचा धुर निघनाऱ्या या जमिनितुन
आता फ़क्त रक्ताचे पाट मुरनार...!!!!

-----सागर



Tuesday, April 28, 2009

मन मनाची चाहुल..!!

मन आक्रांत .........हृदयात भयकांत
विचारांत ओथम्बुन ही .......ओठांवर शांत...!!
मन डोळ्यातले अश्रु ........... मन मिटत्या पापण्या
मन जिवाशी जड़.........मन फूलपाखरू हलके ...!!
मन अन्त्करनि घाव .......... मन प्रेमळ भावना
घाव घातल्या मनाला ...... तुझ्या स्पर्शाची कामना ....!!

मन शांत नही माझे
काळजात हळहळ ..!!
ओठावर स्मितहास्य
आत तिळ तिळ तुटे...!!
मन मनाची चाहुल
तुझ्या मनाचा आधार...!!
माझ्या अस्वस्थ मनाला
तुझ्या श्वासाची फुंकर...!!!


---- सागर

Tuesday, April 14, 2009

सुरुवात भावविश्वाची..!!

शांत बसून विचार केला कि, काही विचार नक्कीच विचार करायला लावतात. तुम्हालाही असाच वाटत असेल कधीतरी!!

समाज मन , सामाजिक प्रश्न आणि त्यातला सामान्य माणूस यात खूप गहिर नात आहे, थोडा विचार करूया ... खूप लिहूया.. !!!

धन्यवाद ..!!