Sunday, October 21, 2012

मनुष्य 'जात'

भिंती अस्वस्थ मनाच्या
जात, धर्म शापित
कुठेतरी अजूनही खोल मनावर
मत्सर द्वेष कटू अनावर 

गेले जवळचे दूर
ना जात धर्म एक
विष विष मनी
हा मनुष्य फक्त हिंस्त्र प्राणी

एकची शरीर ...एकची मन
जात पात अनेक मांडावया
आपुलेच पाय, आपुलेच हात
हिंसा मनी रक्त सांडावया

मी ना फक्त मनुष्य राहिलो
जात फक्त धरून चाललो
एकटा एकटा मी
सर्व एकच तरी.... दुभंगत राहिलो


- सागर